Tuch Tujhi Sobati Lyrics in Marathi and English-Sonalee Kulkarni

Tuch Tujhi Sobati Lyrics is a marathi song by VIDEO PALACETuch Tujhi Sobati Lyrics song features very famous Sonalee Kulkarni.

Tuch Tujhi Sobati Lyrics in Marathi-Sonalee Kulkarni

कुठल्याश्या वळणावरी असेल गाव ओळखीचे

नको घाबरु वळणांना आहे ते तुझ्या सोबतीचे..

उघडूनी डोळे बघ मिळतील साथीदार

दाखवतील ते वाट तू चाल बिनधास्त..

दूर दूर वाट जाते डोंगराच्या मिठीतूनी

पलीकडे उभा असेल तुझ्या यशाचा पक्षी..

कोरडा उभा हा उंच भेगा त्याच्या अंतरी

उमटती त्याच रेषा तुझ्या तळहातावरी..

खडकाची ही वाट लागेल तुला ठेच

चालावे लागेल तुला तुझे ध्येय हेच..

कधी मध्यानीचा सूर्य जीव होईल व्याकुळ

पाणी झिरपता गाली बघ येईल बहर..

डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी

ह्या एकट्या प्रवासात तूच तुझी सोबती..

हो जराशी बेफिकीर घे थोडी मजा लुटून

थोडासा वेडा चाळा हीच जिंदगी ची धून..

चढायचे आहेच मोठे मोठे डोंगर

छोटे छोटे पाऊल टाक अगदी होऊन निडर..

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार

चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार..

मनाच्या खोल डोहात जरी वादळे अनंत

तरी उभा हा निष्चल सर्व भार पेलवित…

मग हरायचे नाही बांध निष्चयाची गाठ

घे नकांशे हाती शोध तुझी तूच वाट..

जेव्हा दिसेल शिखर सुख होईल अनावर

घेता कवेत आकाश होईल जग जिंकल्याचा भास..

ह्या एकट्या प्रवासात, तूच तुझी सोबती

तूच तुझी सोबती..

Also Read: तुजविण मीही अपुरी Lyrics

 

Audio Credit :

Lyrics Gauri Sarnaik
Composer Sagar Patil
Poetry Recital Sonalee Kulkarni
Recorded at Trivikram Studio

Video Credit :

Video Concept & Direction Team Sonalee
DOP & Editor Yash Kaklotar
Artist Sonalee Kulkarni
DI Studio VMPL / Studio 108
Colourist Yogesh Dixit

तुम्हाला हि गाणी आवडू शकतात

तुजविण मीही अपुरी

अंगार भंगार नाय र

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा आम्ही ह्या वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *