Marathi Ukhane 2021

marathi ukhane 2021

Marathi Ukhane 2021, Ukhane in Marathi, Marathi Ukhane for female, Marathi Ukhane for male, Ukhane for Groom, Ukhane for Bride.

महाराष्ट्रात उखाणे/ नाव घेण्याची हि एक प्रचलित परंपरा आहे, खास करून लग्नात. ह्या वेळी नवरीला आणि नवरदेवाला उखाणे घ्यायला

म्हटले जाते. चांगले उखाणे घ्यायला शोध करावा लागतो आणि इथं मी नवरदेवासाठी आणले आहे ५० अशे नवीन आणि मस्त उखाणे.

Marathi Ukhane 2021 (एक्दम नवीन 100)

marathi ukhane 2021

Marathi Ukhane for Groom (नवरदेवासाठी उखाणे )

 

1] जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

 

2] मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा

 

3] श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी

… च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी

 

4] मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,

…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

 

5] सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात,

… चे नाव घेतो … च्या घरात.

 

6] कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास,

… देतो मी लाडवाचा घास.

 

7] अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,

………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

 

8] निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,

…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

 

9] उगवला सुर्य मावळली रजनी,

… चे नाव सदैव माझ्या मनी.

 

10] लग्नाचा वाढदिवस करु साजरा,

.. तुला आणला मोग-याचा गजरा.

Marathi Ukhane for Groom (नवरदेवासाठी उखाणे )

 

11] काही शब्द येतात ओठातून,

….चं नाव मात्र येतं हृदयातून

 

12] हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…

__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे

 

13] एक होती चिऊ, आणि एक होता काऊ…

….च नाव घेतो डोकं नका खाऊ

 

14] माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…

……ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप

 

15] निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे

……च नाव घेतो, लक्ष द्या सारे

 

16] आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा

……च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा

 

17] प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा

शोधून नाही सापडणार, ……सारखा हिरा

 

18] एका वर्षात, महिने असतात बारा

…….मुळे वाढलाय, आनंद सारा!

 

19] प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल

…..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

 

20] एका वर्षात, महिने असतात बारा

……मुळे वाढलाय, आनंद सारा

 

Marathi Ukhane for Groom (नवरदेवासाठी उखाणे )

 

21] गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा

……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

 

22] ……आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड

आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड

 

23] पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा

…….वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा

 

24] सनई आणि चौघडा, वाजतो सप्तसुरांत

…….च नाव घेतो, …….च्या घरात

 

25] मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड

माझ्या ……….च बोलणं, मधापेक्षाही गोड

26] चंद्रामुळे येते, विशाल सागराला भरती

……….च्या नुसत्या हसण्याने, सारे श्रम माझे हरती

 

27] काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार

…..राव शिकलेले आणि मी अडाणी गवार

 

28] जीवनरूपी सागरात सुख-दुःख च्या लाटा,

सुखी संसारात सौ ……. चा अर्धा वाटा

 

29] दुर्वांची जोडी वाहतो गजाननाला

सौ…… सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला

 

30] समुद्राच्या काठावर मऊ-मऊ वाळू

……राव दिसतात साधे,पण आतून एकदम चालू

 

Marathi Ukhane for Groom (नवरदेवासाठी उखाणे )

 

31] श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी

…….चं नाव घेण्याची हि पहिलीच संधी

 

32] आई-वडील, भाऊ-बहीण,जणू गोकुळसारखे घर

… च्या आगमनाने पडलो त्यात भार.

 

33] आंबा गोड्ड, ऊस गोड्ड, त्याही अमृत गोड्ड

…. च नाव आहे अमृत पेक्षाही गोड्ड.

 

34] दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग

सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग

 

35] देवाला भक्त करतो मनोभावे वंदन

……मुले झाले संसाराचे नंदन.

 

36] नंदनवनात अमृताचे कलश

……..आहे माझा खूप सालस

 

37]  मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली

श्रीखंडाचा घास देताना…….मला चावली.

 

38] मुखी असावे प्रेम हातामध्ये दया

……….सोबत जोडली माझी माया

 

39] गुडी पदव्या चा सणाला कडू लिंबचे पान

…….चा रूप पाहून झालो मी बेभान

 

40] जाईजुईच्या फुलांचा दरवळ सुगंध

..…. च्या सहवासात मी झालो धंद

 

Marathi Ukhane for Groom (नवरदेवासाठी उखाणे )

41] कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध

…..च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

 

42] जिजाईसारखे माता, शिवाजीसारख्या पुत्र

… च्या गळ्यात बांधतो मी मंगळसूत्र

 

43] पाव बोटातून होते कलेची निर्मिती,

……ची आणि माझी जडली प्रीती

 

44] सहानुभूतीच्या गुलाबी पाकळ्यात प्रेमाची भर पदटव्ह, तयार होतो प्रेमाचा गुलकंद,

…..नावातच सामावलंय माझा आनंद

 

45] उमाचा महादेव आणि सीतेचा राम

…. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

 

46] श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण

……ला सुखात ठेवी हा माझा पण

 

47] फुलां संगे मातीत सुवास लागे,

……नि माझे जन्मोजन्मी चे धागे

 

48] सौभाग्याची लेणे काळी पोत,

……चा जीवनात उजळीं जीवन ज्योत

 

49] ताज महाल बांधायला कारागीर होतो कुशल

…चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेसिअल

 

50] पुढे जाते वासरू, मागून येते गाय

…….ला आवडते नेहमी दुधावरची साय

 

तुम्हाला आवडू शकतात

मराठी उखाणे

तुम्हाला हि गाणी आवडू शकतात

येऊ कशी तशी मी नांदायला

अंगार भंगार नाय र

नवीन व जुन्या गाण्यांचे बोल मराठी व इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण घेऊन आलोय. त्याच बरोबर मराठी उखाणे सुद्धा

आम्ही ह्या वेबसाईट वर अपलोड करत असतो. नवीन उखाण्यांसाठी तुम्ही ह्या [marathiganelyrics.com] वेबसाईट वर येऊन

भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *