Marathi Ukhane मराठी उखाणे | Ukhane in Marathi for Female | 2021

marathi ukhane 2021

Marathi Ukhane मराठी उखाणे | Ukhane in Marathi for Female | 2021

 

1] पुण्याच्या हायस्कुलमध्ये मुली खेळतात गेम,

(रावांनी) मला प्रश्न विचारला व्हॉट इस युअर नेम

 

2] चांदीच्या परातीत केशराचे पेढे

आमचे हे सोडून बाकी सारे वेडे

 

3] हिरव्या साडीला, काठ आणि जरतारी

(रावंच) नाव घेते, शालू नसून भारी

 

4] मंगळसूत्राच्या दोन वाटी, सासर आणि माहेर

(रावांनी) दिला मला स्वभाग्याचा आहेर

 

5] स्वभाग्याचा अलंकार लाल कुंकू, काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे

(रावांचा) नाव घेते सत्यनारायणा पुढे

 

6] घराला असावे अंगण, अंगणात असावे तुलसी वृंदावन

(रावांच्या) संसाराचे करिन मी नंदनवन

 

7] युगे अठ्ठावीस झाली, विठ्ठल विटेवरी उभा

(राव) आहे माझ्या घराची शोभा

 

8] गणराज गणपती, विद्या देते सरस्वती

(राव) हीच माझी खरी संपत्ती

 

9] यमुनेच्या काठी, कृष्ण वाजवी बासुरी

(रावांच्या) जीवावर, सुखी आहे सासरी

 

10] भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणतात श्री स्वामी समर्थ

(रावांमुळे) आहे माझ्या जीवनाला अर्थ

 

11] जगात नाही एकलव्य सारखा शिष्य

(रावांसाठी) मागते शंभर वर्ष आयुष्य

 

12] सासू-सासर्यांकडून मिळाली, आई-वडलांची माया

(राव) आहे माझ्या, आयुष्याच्या इमारतीचा पाया

 

13] निळ्या-निळ्या आकाशात, ढगांची दाटी

(रावंच) नाव घेते, खास तुमच्या साठी

 

14] चांदणे शिंपीत रात्र आली

(राव) आले आणि माझी तपस्या पूर्ण झाली

 

15] तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी

ईशवर सुखी ठेवो, माझी आणि रावांची जोडी

 

16] तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज

(रावंच) नाव घेते, संक्रांत आहे आज

 

17] ताजमहल बांधण्यासाठी, कारागीर होते कुशल

(रावांच) नाव घेते संक्रातीकरिता स्पेशल

 

18] परिसराच्या ह्रदयात, असते प्रेमाची आस

(रावांचं) नाव घेते, संक्रातीच्या सनाकरिता खास

 

19] संक्रातीचा हलवा कागद्याच्या पुढ्यात

(रावांचं) नाव घेते मैत्रिणीच्या वाड्यात

 

20] संक्रात किंक्रातीच्या आदी असते भोगी

(रावांच्या) सेवेला सदा असते उभी

 

Marathi Ukhane for Female

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *