About us

marathiganelyrics.com काय आहे ?

मराठी संगीत जगातल्या येणाऱ्या सर्व गाण्यांचे बोल मी तुमच्यासाठी ह्या वेबसाइट वर दररोज अपलोड करत असतो. कुठल्याही नवीन मराठी गाण्याचे बोल तुम्हाला ह्या वेबसाइट वर मिळतात. मराठी गाण्यांचे बोल पाहण्यासाठी माझी वेबसाइट एक उत्कृष्ट दर्जाचं काम करत आहे आणि प्रदर्शित झालेल्या गाण्यांचे बोल तुम्हाला सादर करण्याचा माझा उद्देश आहे. माझी वेबसाइट आता फक्त मराठी गाण्यांचे बोल (लिरिक्स) तुमच्या सेवेत आणायचं काम करीत आहे आणि तुमचा प्रतिसाद बघून मी अजून वेगळ्या मराठी विषयांवर (कन्टेन्टवर) काम करणार आहे. ह्या ब्लॉगवर मराठी उखाणे सुद्धा आता अपलोड होत आहे असच अजून भविष्यात बरंच काही मराठी संदर्भ कन्टेन्ट तुम्हाला मिळणार आहे. 

आता पर्यंत तुम्हाला कळलं कि माझ्या ह्या ब्लॉग वर तुम्हाला काय भेटणार आहे, थोडं माग जाता आता आपण बघू कि का मी हा ब्लॉग बनवला?

ब्लॉग का चालू केला?

या अगोदर मराठी भाषेत इंटरनेटवर पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती आता कुठंतरी मराठी लोक मराठी भाषेत माहिती अपलोड करीत आहेत आणि ती प्रेक्षकांपर्यंत आता पसरते आहे. मी पण या ठिकाणी माझा होईल तेवढा योगदान ह्या ठिकाणी देऊ इच्छितो, हा माझा पहिला उद्देश. दुसरा म्हणजे, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मला खूप आनंद देतो आणि या इंटरनेट जगामध्ये मला माझी ओळख म्हणून एक चांगलं योगदान या माध्यमातून देता येईल. या ब्लॉग ला मी माझी ओळख म्हणून ऑनलाईन घेऊन आलोय, मोठं काम नाहीये माझं पण सुरुवात तर छोटीच असते, या ब्लॉग ला मोठं व्हायला तुमचा प्रतिसाद हवा आहे. 

मी कोन आहे?

मी एक विद्यार्थी आहे. मी आता सध्या स्पर्धा परीक्षाची तयारी करीत आहे. त्या बरोबर मी ह्या ब्लॉगवर सुद्धा काम करीत आहे.