मराठी व इंग्लिश
Top 10 नवीन मराठी उखाणे Ukhane In Marathi 2021
1] मिळून काम केल्यावर, काम होतात लवकर
मी चिरते भाजी, आणि (राज्या) लावतो कुकर
2] यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली,
(राणी) आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली
3] लग्न झालं कि नाव घेणं, हा जणू कायदा,
तुमची होते करमणूक, पण आमचा काई फायदा?
4] अंगनी होती उंबर, उंबरीला आला बार
(राज्या) ने साडी घेतली, हिरवी हिरवीगार
5] एक निरंजन दोन वाती, दोन वाती एक ज्योती
(राव) माझे पती, मी त्यांची स्वभाग्यवती
6] विद्या शोभते बुद्धी ने, लक्ष्मी शोभते धनाने
(रावांच्या) जीवावर जीवन जगते मानाने
7] दत्तला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी
रावांच्या जीवावर, मी आहे आनंदी
8] आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
राव आहे माझा, दागिना खरा
9] रातराणीच्या सुवासाने, चाफा झाला मोहित
रावांना आयुष्य मागते, सासू-सासऱ्या सहित
10] तिळासारखा असावा स्नेह, गूळसारखी असावी गोडी
ईश्वर सुखी ठेवो, माझी अन रावांची जोडी